स्पोर्ट्स नर्सरी साकारल्यानंतर तिचे व्यावसायीकीकरण होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. चांगले खेळाडू घडण्यासाठी विविध खेळांना चालना मिळणे हे गरजेचे आहे. त्यासाठी असे उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. पण त्याचा लाभ सर्वांना मोफत मिळण्याची गरज आहे. या उपक्रमांतर्गत खेळाडूंसाठी एखादे शिबिर राबवण्यात यावे, व या शिबिरासाठी निवड करताना कोणताही भेदभाव करू नये. तसेच प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली खेळाडूंची लूट होणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ.फईम सय्यद
उपक्रम फायदेशीर ठरेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2019, 5:44 am