अ‍ॅपशहर

नेप्तीनाका येथे बेशिस्त वाहतूक

Maharashtra Times 21 Jan 2017, 1:49 pm
नगर : कल्याण रोडवर नेप्ती नाका हा चौक वाहतुकीसाठी आहे की वाहने उभी करून प्रवासी भरण्याचा मुक्त स्टँड आहे, हेच कळत नाही. येथे विविध मार्गांवर जाणाऱ्या रिक्षा जागा मिळेल तेथे उभ्या केल्या जातात. अन्य वाहनेही प्रवासी घेण्यासाठी तेथे थांबतात. प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत एकमेकांच्या समोर वाहने उभी केली जात असल्याने रस्त्यावर कोंडी होतेच, शिवाय पाठीमागून येत असलेल्या वाहनांना पुढील रस्ता दिसत नाही. वाहतूक पोलिसांनी या चौकात शिस्त लावण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic indiscipline at neptinaka
नेप्तीनाका येथे बेशिस्त वाहतूक


- दिनेश कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज