शहरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे वाहनांची वर्दळ कायमच असते. शहरातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा तर हॉस्पिटलच्या गेटसमोरच उभ्या राहतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत असते. गेटसमोरच रिक्षा उभ्या केल्याने हॉस्पिटलमध्ये जाण्यासही रस्ता राहत नाही. रुग्णवाहिकांनाही या त्रासास तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन या बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
सिव्हीलला रिक्षांचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2018, 5:44 am