नगर : बंगाल चौकी ते मार्केट यार्ड रोडवर जुनी वसंत टॉकिज परिसरात रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या भागात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची सोय नाही. त्यामुळे वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. मात्र, त्यातील अनेक जण शिस्त पाळत नाहीत. त्यामुळे अन्य वाहनांना अडथळा निर्माण होऊन रस्त्यावर कोंडी होते. यातून मार्ग काढण्याची गरज आहे.- ज्ञानेश्वर वाघ
बंगालचौकीजवळ बेशिस्त पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2017, 5:34 am