सावेडीतोफखाना पोलिस ठाण्याच्या समोर पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे तेथील रस्त्यावरून पाणी वाहते आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर पाणी गळतीचे प्रकार सतत सुरू असतात. अनेकदा ड्रेनेज फुटून घाण पाणीही रस्त्यावरून वाहत असते. त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे.- अरविंद मुनगेल
पोलिस ठाण्यासमोर पाणी गळती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2017, 5:35 am