शहरातील गुलमंडी ते पैठण गेट व्हाया गोमटेश मार्केट दलालवाडी रोड आणि पैठण गेट ते गुलमंडी व्हाया टिळक पथ हे रोड वनवे असतानादेखील या रोडवर वर वाहनधारक रॉंग साईड ने वाहने चालविताना आढळतात.तसेच व्यापारी दालनासमोर वाहन धारक मन मानेल तेथे मोकळ्या जागी बेशिस्तपणे वाहने लावतात.त्यामुळे या रोडवर वारंवार वाहतूक कोंडी होत असते.रोड वनवे असतानासुद्धा नियम पायदळी तुडवल्या जातात शहर वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी रॉंग साईड ने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना कारवाईचा बडगा उगारल्यास वाहतूक शिस्त लागू शकते असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.श्री रवींद्र तायडे
औरंगाबादकर राँगसाईडच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Oct 2018, 5:31 am