अ‍ॅपशहर

पाइप फुटल्याने दूषित पाणी

Maharashtra Times 19 Sep 2016, 1:34 pm
जालना रोडवरील धूत हाॅस्पिटलच्या कंपाउंड वाॅलशेजारी पिण्याच्या पाण्याची पाइप लाइन फुटल्याचे दिसते. तेथे अनेक दिवसांपासून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला हे दिसत नसेल का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो. येथे काही लोक येथे कपडे धुतात. रिक्षाचालक रिक्षा धुताना आढळतात. या प्रकारामुळे जलवाहिनीतील पाणी प्रदूषित होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने फुटलेली पाइप लाइन तातडीने दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम contaminated water because of broken pipe
पाइप फुटल्याने दूषित पाणी



-समाधान देशमुख

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज