सदर फोटो हा सहकार नगर चौक ते दशमेश नगर रोड वरील असून सिंगारे कोचिंग क्लास च्या अगदी बाजूला असलेली ही उघडी डीपी असून येथे अनेक छोटे विद्यार्थी आसपास फिरतात या बाबत अनेक वेळा वीज महावितरण तसेच महापालिकेला तोंडी व लेखी सूचना दिल्या परंतु दोन्ही विभागाने लक्ष केले नाही ज्या वेळेस एखादी दुर्घटना घडेल तेव्हाच लक्ष करणार आहे का ? ही डीपी संबंधीत विभागाने तात्काळ हलवावी किंवा त्या डीपी ला दार करून कुलूप बंद करावी महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर विवेक चोबे झाम्बड इस्टेट औरंगाबाद
धोकादायक उघडी डीपी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2019, 1:19 pm