बसस्थानकाच्या शंभर मीटर परिसरात खाजगी वाहने लावण्यास पुर्णपणे प्रतिबंध असतांना खाजगी वाहनधारक कुणाचाही मुलहिजा न ठेवता खुलेआमपणे चक्क वाहनासह सिडको बसस्थानकाच्या मध्ये प्रवेशतांना दिसतात.येथे प्रवेशव्दाराजवळ सुरक्षा रक्षकांचा तगडा बंदोबस्त लावलेला आहे,वाहतुक पोलिसांची व्हॅन दररोज नित्यनेमाने येऊन नियोजित पार्किंगमध्ये न लावलेली वाहने उचलुन दंडात्मक कारवाई करतात.बऱ्याचदा ऑटोरिक्षा चालक ही ऑटोरिक्षा सह बसस्थाकात प्रवेश करतात, खाजगी वाहनांचे एजंटही येथील प्रवासी पळवतात येथील स्वछता गुहाजवळ बेशिस्तीत वाहने पार्क केलेलीं असतात, हे विशेष, बेशिस्त वाहनधारक कडक कारवाई करण्याची मागणी होत आहेरवींद्र तायडे
वाहनधारकांना बसस्थानकात सहज प्रवेश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2017, 5:33 am