अ‍ॅपशहर

कचरा मैदानावर

Maharashtra Times 18 May 2017, 3:10 pm
गारखेड्यातील यशवंत कला महाविद्यालयाच्या प्रांगणात सध्या रोज एक विवाह सोहळा होत आहे. हे मैदान अशा कार्यक्रमासाठी भाड्याने दिले जाते. मात्र, असे सोहळे झाल्यानंतर यजमान इथला कचरा उचलण्याची तसदी घेत नाहीत. मैदानावर उरलेले अन्न, ग्लास, पत्रावळी, द्रोण यांचा खच पडलेला असतो. परिसरातील नागरिक रोज सकाळी येथे व्यायाम आणि योगा करण्यासाठी येतात. त्यांना या अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. परिसरात दुर्गंधी पसरते. औरंगाबाद महापालिकेची स्वच्छतेबाबत देशपातळीवर घसरण झाली आहे. या कचराफेकीकडे पालिकेचे पथक लक्ष देणार का? काही कारवाई करणार का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage problem
कचरा मैदानावर


- अनिल बोडखे-पाटील, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज