वॉर्ड नंबर 2 अंतर्गत साफल्य नगर, म्हसोबनगर, व्यंकटेशनगर,अशोकनगर, मयूर पार्क परिसर आदी मोठ्या नागरी वसाहती येतात.जळगाव रोड वर ये जा करण्यासाठी नागरिकांना ऑडिटर्स सोसायटी ते हर्सूल टी पॉईंट या रस्त्याचा वापर करावा लागतो. परंतु या रोडचे अद्यापही डांबरीकरण न केल्याने रोड लगत असणाऱ्या सदनिका धारकांना व व्यापारी दालनांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रोडचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.रवींद्र तायडे
हर्सूल टी पॉईंट ते ऑडिटर्स सोसायटी रोडचे डांबरीकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Feb 2018, 5:32 am