अ‍ॅपशहर

फाजलपुऱ्यातील अरुंद पूल धोकादायक

Maharashtra Times 26 Nov 2016, 12:09 pm
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी जुन्या शहरातील फाजलपुरा ते चेलिपुरा चौक रोडवर फाजलपुऱ्याच्या ऐतिहासिक पूल तोडला. भूमिगतच्या कामासाठी रस्ता काही दिवसाकरिता बंद केल्याने मनस्ताप सहन करावा लागला होता. पुलावरील रस्ता पूर्ववत व सुरळीत करणे अपेक्षित असताना सबंधितांनी पुलावरील रस्ता आणखी अरूंद तर केलाच, पण त्यावर पक्के संरक्षक कठडेही अभारले नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पुलावरील वाहतुकीची वर्दळ पाहता पुलावरील खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम narrow bridge dangerous
फाजलपुऱ्यातील अरुंद पूल धोकादायक




- रवींद्र तायडे, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज