अ‍ॅपशहर

एटीएममध्ये कॅश नसल्याने गैरसोय

Maharashtra Times 24 Apr 2017, 4:55 pm
औरंगाबादमध्ये मार्च एंड आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहयोगी बँकांचे विलिनीकरण यामुळे १ एप्रिलपासून निर्माण झालेला एटीएममधील कॅशचा तुटवडा कायम होता. शहरात असलेल्या ७०० एटीएमपैकी जवळपास ७० टक्के एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक नागरिक भर उन्हात एटीएमची चाचपणी करीत पायपिट करताना दिसत होते. दुसरीकडे मात्र एटीएम बंद असल्याने नागरिकांनी पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केल्याचे चित्र होते. पगारी आठवडा असल्याने पेन्शनरांनी बँकांमध्ये पेन्शन काढण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांना अद्यापही पेन्शन मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no cash in atm
एटीएममध्ये कॅश नसल्याने गैरसोय


- महेंद्र रमंडवाल, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज