महापालिकेचे उस्मानपुरा भागात संत एकनाथ रंगमंदिर आहे. तेथे अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल असते. रंगमंदिराची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था असतानाही प्रेक्षक आपली वाहने रंगमंदिरासमोरील रोडवरच अस्ताव्यस्तपणे लावून मोकळी होतात. त्यामुळे ट्रॅफिक जॅम होते. पार्किंग व्यवस्थेच्या प्रवेशद्वाराजवळही वाहने आडवी-तिडवी लावलेली असतात. वाहनधारकांना दंडात्मक शिस्त लावण्याची मागणी होत आहे.
पार्किंग असूनही वाहने रस्त्यावर
Maharashtra Times 14 Feb 2017, 3:20 pm