सदर छायाचित्र हे अदालत रोड वरील सतीश मोटर्स जवळील असून समर्थ रोड ते अदालत रोड हा सिमेंटचा रस्ता केला सतीश मोटर्स येथे हा रस्ता संपतो ज्याना हे रस्त्याचे काम दिले त्यांनी रस्ता जिथे संपतो तेथुन पुढे दोन ते तीन फूट सिमेंट किंवा डांबर टाकून थोडा उतार करायला हवा होता परंतु ठेकेदाराने तसे केले नाही त्या मुळे येथे रस्ता खाली वर झाला हा रस्ता कायम वर्दळीचा त्यात ह्या ठिकाणी प्रत्येक वाहन आदळते अनेक वेळा अंदाज न आल्याने वाहन धारकाचा अपघात होतो म,न,पा ने तात्काळ लक्ष करून येथे डांबर टाकून उतार केल्यास वाहन धारकांची सोय होईल विवेक श्रीकृष्ण चोबे झाम्बड इस्टेट
रस्त्याचे अर्धवट काम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jun 2020, 5:30 am