डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विश्रामगृह परिसरात डुकरांचा संचार वाढला आहे. विद्यापीठात येणाऱ्या अनेक मान्यवर पाहुण्यांचा येथे मुक्काम असतो. अनेकज व्यक्ती सकाळी येथे मॉर्निंग वॉक, व्यायाम आणि योगासने करण्यासाठी येतात. मात्र, डुकरांच्या सुळसुळाटाने त्यांना त्रास सहन करावा लागतो. येथील डुकरे हटविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कधी जागे होणार, की त्यांनी पाहुण्यांना चावाच घेतला पाहिजे?
- सतीश अन्वेकर, औरंगाबाद