नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने सिडको एन-३, एन-४ भागातील एका मोठ्या भूखंडावर महापालिकेतर्फे स्वामी विवेकानंद उद्यान उभारले आहे. तेथील मैदानाची दुरवस्था झाली आहे. जॉगिंग ट्रॅक उद्ध्वस्त झाला असून, चोहिकडे तण वाढले आहे. घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे. हिरवळीचा तर थांगपत्ताही नाही. हायमास्ट कधी चालू, तर कधी बंद असतो. येथे स्वच्छता नाही. ओसाड व भकास दृश्य बघायला मिळते. या उद्यानाचे पुनर्जीवन करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
- रवींद्र तायडे
- रवींद्र तायडे