अ‍ॅपशहर

वडगाव कोल्हाटीत पाणीप्रश्न गंभीर

Maharashtra Times 28 Apr 2017, 3:52 pm
वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या वडगाव कोल्हाटी येथे गेल्या महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई आहे. नागरिकांना व महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने तहसील प्रशासनाकडे नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी १५ टँकरचा प्रस्ताव पाठविला, मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थामधून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होताना दिसतो. वडगाव कोल्हाटी येथील नागरिकांना एक ते दीड महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महिला व नागरिकांना पिण्याचा हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सुरुवातीस कंपन्या व सोसायटीमधील नागरिकांनी वडगाववासीयांनी पाणी दिले, परंतु दररोजच नागरिक पाण्यासाठी कंपनीच्या गेटवर येत असल्याने आता अनेक कंपन्या पाणी देण्यासाठी नकार देत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water problem
वडगाव कोल्हाटीत पाणीप्रश्न गंभीर


- महेंद्र रमंडवाल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज