सिडको एन ८ येथील श्री बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये जवळपास २ वर्षांपासून मिनी ट्रेन उपलब्ध करून दिली आहे. परंतु उद्घाटना अभावी सदर मिनी ट्रेन अजूनही बाळगोपाळांसाठी उपलब्ध झाली नाही. उन्हाळा-दिवाळी च्या सुट्टी मध्ये मुलांना आगगाडी चा आनंद मिळावा या साठी ही ट्रेन बसविण्यात आली आहे.सध्या संपूर्ण ट्रॅक वर गवत, झाडेझुडपे उगवली आहेत. ट्रेन गंजण्याच्या मार्गावर आहे.हा सर्व जनतेने कर रुपाने भरलेल्या पैशाचा अपव्यय आहे. एवढे पैसे खर्च करून दुसरा एखादा सामाजिक उपक्रम तरी राबविण्यात आला असता.तरी संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालून मिनी ट्रेन सुरु करावी आणि बाळगोपाळांना आनंद द्यावा ही विनंती.प्रेषक:महेश उमरदंड, औरंगाबाद
मिनी ट्रेन धावणार केव्हा?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jul 2019, 5:47 am