हर्सूल टी पाँईट व एस.बी.ओ.ए पब्लीक स्कुल समोरील जळगाव रोड चौकात वाहतूकीचे नियमन करण्यासाठी सिग्नलचे खांब उभारलेले आहेत. १५ जून पासून शाळा सुरु झाल्याने एस.बी.ओ.ए चौक व हर्सूल टी पाँईट येथे प्रचंड गर्दी होते. वाहने आमनेसामने येऊन अपघात होतात, यु टर्न घेतांना अक्षरशः कसरत करावी लागते. हर्सूल टी पाँईट जवळ चोरटे सक्रिय झाल्याने महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र तोडण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. हर्सूल टी पाँईट व एस.बी.ओ.ए चौकात तातडीने सी.सी.टी.व्ही कॅमेरे व सिग्नल यंत्रणा कार्यान्विंत करण्याची मागणी होत आहे.रवींद्र तायडे
सिग्नल केंव्हा सुरु होणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2017, 5:33 am