अ‍ॅपशहर

‘सिटीझन रिपोर्टर’मुळे मानसिकताही बदलेल

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘सिटीझन रिपोर्टर’ उपक्रमामुळे केवळ प्रशासनाला जाग येऊन कामे होणे नव्हे तर जनतेची मानसिकताही बदलण्यास मदत होईल. आम्ही पाठविलेल्या फोटो आणि बातम्यांचे नागरिकांमध्येही पडसाद उमटताना दिसून आले.

Maharashtra Times 8 Mar 2016, 1:16 am
नगरः ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘सिटीझन रिपोर्टर’ उपक्रमामुळे केवळ प्रशासनाला जाग येऊन कामे होणे नव्हे तर जनतेची मानसिकताही बदलण्यास मदत होईल. आम्ही पाठविलेल्या फोटो आणि बातम्यांचे नागरिकांमध्येही पडसाद उमटताना दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम जसा व्यापक होत जाईल, तसे समस्यांच्या मुळाशी जाण्यात ‘मटा’ला यश येईल, असा विश्वास ‘सिटीझन रिपोर्टर’ बनलेल्या नागरिकांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम citizen reporter of the week
‘सिटीझन रिपोर्टर’मुळे मानसिकताही बदलेल


या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागरिकांचा शुक्रवारी ‘म.टा.’च्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. डॉ. संजय सोनवणे (घोडेगाव), ऋषिकेश आगरकर (नगर) व योगेश काकडे (सावेडी) यांचा यामध्ये समावेश होता. यातील डॉ. सोनवणे ‘बेस्ट सिटीझन रिपोर्टर’चे मानकरी ठरले. त्यांनी घोडेगावमधील बंद पडलेल्या पथदिव्याचा फोटो पाठविला होता. त्यानंतर तातडीने या दिव्याची दुरूस्ती झाली. आगरकर यांनी अतिक्रमणांचा प्रश्न तर काकडे यांनी स्वच्छता, प्लास्टीक कचऱ्याचा जनावरांना होणारा धोका हे प्रश्न मांडले.

समस्या सोडविण्यासाठी केवळ सत्ताधारी आणि प्रशासन यांना जागे करून उपयोग नाही, तर जनतेचीही मानसिकता बदलणे गरजे आहे. ते काम या उपक्रमात होत आहे.

- डॉ. संजय सोनवणे

हा उपक्रम खूपच छान आणि प्रभावी आहे. ज्यांना आपल्या भागातील प्रश्न कोठे तरी मांडले जावेत, ते सुटावेत असे वाटते त्यांनी ‘सिटीझन रिपोर्टर’ हे अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे. - ऋषिकेश आगरकर

नागरिकांचे प्रश्न मांडताना त्रास होण्याची शक्यता आहे, मात्र तरुणांनी न घाबरता चांगल्या उद्देशाने हे काम करीत राहिले पाहिजे. या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने काम करून इच्छिणाऱ्यांना बळ मिळणार आहे. - योगेश काकडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज