म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या विविध भागांत फिरताना सर्वसामान्य नागरिकांना दिसणाऱ्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सुरू केलेला ‘सिटीझन रिपोर्टर’ हा प्रभावी उपक्रम आहे, अशी भावना या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी व्यक्त केली.
सिटीझन रिपोर्टर या अॅपद्वारे गेल्या आठवड्यात उल्लेखनीय वार्तांकन केलेल्या मनोज साळी, विवेक लबडे, सलीम डांगे यांचा ‘मटा’तर्फे प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. ‘नागरिकांना स्थानिक समस्या प्रभावीपणे मांडता याव्यात, यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सुरू केलेला ‘सिटीझन रिपोर्टर’ हा अत्यंत प्रभावी उपक्रम असून, त्याद्वारे नागरी प्रश्न सोडविण्यास मदतच होणार आहे. या अॅपमुळे सार्वजनिक समस्या पेपरमधून अनेक लोकांपर्यंत पोहोचतात,’ अशी भावना या वेळी त्यांनी व्यक्त केली.
पुण्यासारख्या शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असताना, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘मटा’ने ‘सिटीझन रिपोर्टर’ उपक्रमाची सुरुवात केली आहे. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक गोष्टी, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न-समस्या, रस्ते-पाणी-वीज यांसह ड्रेनेज, स्वच्छता याबाबतच्या तक्रारी व्यवस्थेपर्यंत थेट मांडण्याची संधी या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहराच्या विविध भागातील, विविध वयोगटातील नागरिकांनी हे अॅप्लिकेशन डाउनलोड केले असून दररोज ते त्यांना खटकणाऱ्या समस्या ‘मटा’पर्यंत पोहोचवतात. त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रमाणपत्र देऊन मनोज साळी, विवेक लबडे आणि सलीम डांगे यांचा गौरव करण्यात आला.