सध्या कोल्हापूर शहरात मनपा तर्फे अतिक्रमण निर्मूलन युद्ध पातळीवर राबवली जात आहे. रोज आपल्या म टा मध्ये त्याबद्दल बातम्या येत आहेत. पण शहराच्या मध्यवस्तीत लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन ला लागूनच असलेल्या चित्रपट गृहाने सार्वजनिक रस्त्यावर लोखंडी बॅरिकेड्स लावून अत्यन्त वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमण करून खाजगी पार्किंग साठी रस्ता बळकावून पैसे घेऊन पार्किंग केले जात आहे , हे शेजारीच असलेल्या झोपेचे सोंग घेतलेल्या पोलीस स्टेशन अधिकाऱ्याना आणि मनपा अधिकाऱयांना दिसत नाही का?
ढळढळीत राजरोस अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2018, 5:41 am