कोल्हापूरातील तोरणा नगर येथील गटर सापडेना.मध्यम व उच्च वर्गीय वस्ती असलेल्या तोरणा नगर मधे मागील तीस वर्षे गटर बाधंणी झाली नाही.सदर भागात तीन भव्य मैदान दोन छोटी उद्याने असलेने येथे नागरी वस्ती कमी असल्याने लोक प्रतिनिधी मतांची गोळा बेरीज करून व त्याचे राजकारण करत आहेत प्रसंगी येथील विकास खुटंला आहे.महापालिकेला कळवून सुध्दा निधीचे कारण पुढे केले जाते. मागील तीस वर्षात किरकोळ निधी या गटरीकरिता प्रशासन देवू शकत नाही याबद्दल लोकांनमधून त्रिव संताप निघत आहे.मा.आयुक्त महोदयांनी याकडे लक्ष केंद्रित करावे अशी विनंती करीत आहोत।
गटर सापडेना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2018, 5:40 am