अ‍ॅपशहर

स्वच्छतागृहांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

Maharashtra Times 30 Nov 2016, 1:14 pm
महापालिकेच्या शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट आहे. नागरिकांना नाइलाजस्तव नाक धरूनच स्वच्छतागृहांचा वापर करावा लागतो. काही वर्षांपूर्वी आरोग्य विभागाकडून निदान एक दिवसआड पाणी फवारणी करून व जंतुनाशक फवारणी करून स्वच्छता ठेवली जायची. सध्या प्रशासनाचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असून, शहरातील जवळपास सर्व स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येते. प्रशासन जागे केव्हा होणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम municipal ignored the toilets
स्वच्छतागृहांकडे महापालिकेचे दुर्लक्ष



- विश्वनाथ गाडवे, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज