शास्त्रीनगर ग्राउंड शेजारी फायर ब्रिगेड जवळ मुख्य रस्त्यावर उघडा खड्डा आहे.हा मुख्य रस्ता असल्यामुळे येथे वाहतूक खूप असते.भर रस्त्यात असणारा हा खड्डा अपघातास कारणीभूत ठरत आहे.रात्रीच्या वेळी तर वाहन चालकास हा खड्डा दिसून येत नाही.याच्या भोवती सुरक्षा बॅरिगेट्स पण लावलेली नाहीत.नवीन दुचाकी चालकांना तर हा खड्डा जीवघेणा ठरू शकतो.तरी महानगर पालिकेने याकडे लक्ष द्यावे.
शास्त्रीनगर मुख्य रस्त्यावर खड्डा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2018, 5:33 am