१०/१०/२०१८ रोजी अंधेरी -पश्चिम, अंबोली म्हातारपाडा, श्री महालक्ष्मी सोसायटी व ओशीया कॉर्नर सोसायटी यांच्या मधून सैनिक नगरकडे जाणाऱ्या रस्त्यामधील गटाराचे चेंबर व झाकण अवजड वाहानामुळे तुटल्याने धोकादायक झाले आहे.अशा आशयाची समस्या म.टा.सिटीझन रिपोर्टर मध्ये पाठविली असता त्याची दखल घेवून संबंधीत विभागाने गटार व चेंबर दुरुस्त केले. त्याची नोंद दि.७/११/२०१८ च्या. म.टा.सिटीझन रिपोर्टर मध्ये पाठविली होती. आज दि.१९/६/२०१९ रोजी सदर रस्त्यामधील दुरुस्त केलेल्या गटाराचे चेंबर अवजड वाहानाच्या भारामुळे तुटून अपघात झाला आहे. तरी याची संबंधित विभागाने त्वरीत गंभीरपणे नोंद घेवून सदर गटाराचे चेंबर दुरुस्त करून पुन्हा तुटणार नाही याची दक्षता घ्यावी.
चेंबर पुन्हा तुटले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jun 2019, 5:40 am