मालाड पश्चिम येथील लिबर्टी गार्डन रस्ता क्र. १ येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. संबंधित प्रभागातील घनकचरा व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रारी करून याकडे दुर्लक्ष होत आहे. बऱ्याच दिवसांपासून हा कचरा उचलला जात नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तरी संबंधित विभागाने तातडीने हालचाली कराव्यात व कचरा साफ करावा. - उत्कर्ष बोर्ले
कचरा कुंडी हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2019, 5:40 am