गोरेगांव पश्चिम लिंक रोड बांगुर नगर गंगाज्योती सोसायटी संलग्न कित्येक वर्षे अर्धवट बांधकाम स्थितीतील इमारतींच्या आवारात, मोकळ्या भूखंडांवर समाजकंटाकाना आश्रय आणि कचरा मातीचे दुर्गंधीयुक्त ढीग साचून जंगली झाडं, गवत वाढ. महापालिका फक्त आपले सार्वजनिक रस्ते साफ करते परंतु अशा उपद्रवी ठिकाणी सोईस्कर दुर्लक्ष करते. वास्तविक नागरी आरोग्याचा विचार करून संबंधित जमीन मालकांना पालिकेतर्फे स्वच्छतेची नोटीस देणे वा स्वतः साफ करून दंडासहित सर्व खर्च वसूल करणे आवश्यक आहे. कुठेही नो मॅन लँड/एरिया मुळीच असता नये.राजेश रामनाथकर
खाजगी आवारात कचरा मातीचे ढीग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Nov 2019, 5:42 am