अंधेरी पूर्वेकडील जे बी नगर मधील ओमनगर चौकातील ए१ विद्यादाणी इमारती जवळील महापालिकेच्या पाण्याचा हा वाॅल्व्ह गेले कित्येक महिने अशा गळक्या अवस्थेत आहे. सकाळी ५ वाजल्यापासून ८-८.३० पर्यंत तो असाच गळत असतो व आजूबाजूचे टपरीवाले डबे भरून पाणी घेऊन जात असतात. महापालिकेने तो त्वरित दुरूस्त करावा व पाण्याचा दुरूपयोग थांबवावा. दिलीप पेडणेकर (अंधेरी)
गळका वाॅल्व्ह दुरूस्त करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2021, 5:32 am