कुर्ला पुर्व येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचण्यासाठी अजुन बेस्ट ची बस सेवा उपलब्ध नाही. मुंबईच्या कानाकोपऱ्यात आज बेस्टची मिनी बस सुविधा उपलब्ध होत असताना या महत्त्वाच्या ठिकाणी पोहचण्यास प्रवाशांना बरेच हाल सोसावे लागत आहेत. हे टर्मिनस कुर्ला, घाटकोपर किंवा चेंबुर या रेल्वे स्थानका पासून फार लांब आहे. सर्व संबंधित प्रशासनाने अजुन या बाबीकडे दुर्लक्ष का केले आहे ? हा प्रश्न सतावत आहे. कुर्ला ते घाटकोपर रेल्वे स्थानक, अशी सेवा देत मध्येच सदर टर्मिनस मार्गे 'मार्ग' होऊ शकतो याचा संबंधित यंत्रणेने विचार करावा.
टर्मिनस ला बेस्ट बस हवी.....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 3:15 pm