बोरिवली पश्चिमेकडील स्कायवॉक महानगरपालिकेने भिकारी, फेरीवाले व समाजकंटकांना जणू आंदण दिला आहे. पश्चिम रेल्वेच्या एक क्रमांक प्लॅटफॉर्मच्या बाजूने उतरणाऱ्या दादरवर रोज कोणीतरी शौच केलेले असते. संपूर्ण स्कायवॉकवर दिवसाढवळ्या अनेकजण झोपलेले असतात. स्कायवॉकवर अनेक ठिकाणी लाद्या उखडलेल्या आहेत. रात्री स्कायवॉकचा आसरा घेणारे तिथेच प्रातर्विधी उरकातात. तरी संबंधित यंत्रणा याची दखल घेऊन कारवाई करतील का?
स्कायवॉकची दुर्दशा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2019, 5:47 am