घाटकोपर (प), झुनझुनवाला काँलेज समोरील रेल्वे तिकीट घराच्या आवारात सध्या वाढत्या रेल्वे प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्कीने येथे ये जा करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा जीव रोजच मेटाकुटीला येत आहे.म्हणून पूर्वेला असलेल्या अद्यायावत तिकीटघराप्रमाणेच येथे दुमजली तिकीटघर हवे,असे प्रवाशांकडून ऐकण्यास मिळते. फलाट एकला लागूनच हे तिकीटघर असून या फलाटावर लोकल येताच बाहेर पडणारा प्रवाशांचा लोंढा तिकीटबारीवरील रांगेत उभ्या असणाऱ्या प्रवाशांवर आदळतो. त्यातच काँलेज आणि इतर ये जा करणारे विद्यार्थी, महिला,व्रूध्द,रूग्ण,दिव्यांग या सर्वांना या अवास्तव गर्दीचा फटका बसतो. म्हणून येथे दुमजली तिकीटघर उपलब्ध झाल्यास रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. सुरेश कु-हे , घाटकोपर
दुमजली तिकीटघर हवे।
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2018, 5:36 am