माहीम रेल्वे स्थानकाच्या रेल्वेच्या हद्दीत-हार्बर प्लॅटफॉर्मच्या बाजूला वाढलेल्या बेकायदा झोपडपट्टीत हार्बर रेल्वे रुळाच्या बाजूला कचरा टाकला जातो आणि हा कचरा रोज जाळला जातो.या कचऱ्याचा धूर दिवसभर सर्वत्र पसरतो त्यामुळे माहीम स्थानक पूर्वेला असणाऱ्या शाहूनगर वसाहतीतील रहिवासीयांना या धुराचा त्रास होतो.दिवसेंदिवस येथीलअनधिकृत झोपडपट्टी वाढत चालली आहे.रेल्वे प्रशासनाने बेकायदा बांधण्यात आलेल्या या झोपडपट्टी वासीयांना हटवावे तसेच कचरा टाकणाऱ्या आणि जाळणाऱ्या लोकांवर कारवाई करावी. मकरंद काणे(शाहूनगर) मकरंदकाणे(शाहूनगर)
माहीम रेल्वे हद्दीतील अनधिकृत झोपडपट्टी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Oct 2018, 5:34 am