कोट्यवधी रूपये खर्च करून महापालिकेने शहरात पथदिवे बसविले आहेत. रात्रीच्या वेळी हे पथदिवे सुरू असणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. बजाज नगर, सेंट्रल बाजार रोडवर असलेले पथदिवे दिवसा सुरू रहात आहेत. त्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. पथदिवे नियोजित वेळेवर सुरू होणे अपेक्षित आहे. - संगीता वाईकर
दिवसा पडतोय उजेड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2017, 5:35 am