टेलिकॉमनगरातील रस्त्यांवर बांधकाम साहित्य पडून आहे. रेती, गिट्टी, लोखंडी सळाखींचा याम समावेश आहे. हे साहित्य या भागातून वावरणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांसाठी धोक्याचे ठरत आहे. या भागात पडून असलेले साहित्य तत्काळ उचलण्याबाबत नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही साहित्य उचलण्यात येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2020, 5:45 am