गणेशपेठ परिसरात शहर बस सेवेचा थांबा आहे. या थांब्याच्या दुरवस्था झाली आहे. थांब्यावर छत नसल्याने प्रवाशांना उन्हातान्हात थांबावे लागते. थांब्याच्या आसपास अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे येथे थांबायचे असल्यास प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- रोहित भगत
शहर बस थांब्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2017, 5:37 am