नरेंद्रनगरातील रेल्वे अंडरब्रीजजवळ रेल्वेचे लोखंडी बॅरीकेड पडून आहे. जास्त उंची असलेली वाहने पुलाखालुन जाऊ नये यासाठी हे बॅरीकेड उभारण्यात आले होते. परंतु एका ट्रकच्या धडकेनंतर हे लोखंडी भंगार येथेच फेकुन देण्यात आले आहे. त्यावर एखादे वाहन धडकल्यास प्राणघातक अपघात घडू शकतो. मात्र रेल्वेचे याकडे लक्ष नाही.- केतन मेश्राम
रेल्वे पुलाजवळ प्राणघातक भंगार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2021, 5:31 am