बेसा परिसरातील शिवकृपा नगरातील लोक कच्च्या रस्त्यामुळे त्रासले आहेत. नागपूर शहरात सिमेंट, डांबरी रस्ते तयार करण्यात येत आहेत. परंतु बेस्यातील शिवकृपा नगरात अद्यापही रस्ताच तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथुन वाहतूक करणे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या भागातील रस्ते तयार करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.- मनोज कठाळे
कच्च्या रस्त्यामुळे त्रासले लोक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2017, 5:32 am