धरमपेठेतील लक्ष्मी भुवन चौकातील फूटपाथ अतिक्रमणाने गिळंकृत केले आहे. या मार्गावर अनेक जणांनी रस्त्यावर आणि फूटपाथवर दुकाने थाटली आहेत. त्यावर वाहने देखील उभी ठेवण्यात येतात. या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने परिस्थिती बिकट होत आहे.- अजय देवघरे
फूटपाथ गिळले अतिक्रमणाने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jul 2017, 5:34 am