चंद्रमणी नगरातील सार्वजनिक उद्यानातील दिवे सुमारे दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे उद्यानात सर्वत्र अंधार पसरला आहे. या भागातील मुलांना खेळण्यासाठी हे एकमेव उद्यान आहे. त्यातही दिवे नसल्याने खेळताना मुलांना धोका पत्करून खेळावे लागत आहे. त्यामुळे येथील दिवे सुरू करणे अत्यावश्यक आहे.- आर. चंद्रकांत
उद्यानातील दिवे बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2018, 5:35 am