सोमेश्वर जवळील विकी गार्डन रेस्टोरन्ट मध्ये बाहेरून विकत आणुन दारू पिणे सर्रास चालते. हा अधिकृत बार नाही. इथले ग्राहक बऱ्याचदा रस्त्यात हुज्जत घालत असतात. हॉटेलच्या बाजूचा परिसर मुतारी करून टाकला आहे. ह्या भागात अंधार असल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करताना सुरक्षित वाटत नाही.संबंधित शासकीय अधिकारी अश्या अनधिकृत बारकडे कानाडोळा का करत असावीत? या परिसरात सोयीस्कर रित्या अंधार केला असावा का? इथले पथदीप त्वरित सुरु करण्यात यावे.
दारू पिण्याचे अनधिकृत अड्डे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2017, 5:34 am