डिसुझा कॉलनी येथील निर्मल होमसमोरील शिवगिरी कॉलनी गार्डनची अनेक दिवसांपासून स्वच्छताच करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्यांना गैरसोय सहन करावी लागत आहे. येथेच शिवगिरी हास्य क्लबचा वर्ग भरत असतो. संबंधितांनी या गार्डनची स्वच्छता करून, गवत काढून डासांपासून हा परिसर मुक्त करावा. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर होऊ शकेल.
-चंद्रशेखर साठे
-चंद्रशेखर साठे