आम्ही पोटावरची माणसं, सकाळ व संध्याकाळचे जेवण हीच आमची खरी समस्या त्यासाठी आम्हाला रात्रीचं वास्तव्य आम्हाला याच जागेवर काढुन सकाळी दोन घासांचा स्वयंपाक करावा लागतो व परत जेथे काम मिळेल तेथे जावे लागते, यासाठी या जागेवर आम्हाला काही ठराविक दिवस थांबून परत जावे लागले त्यासाठी आम्हाला तात्पुरते का होईना येथे महापालिकेने स्वच्छता गृह बांधुन द्यावे ही विनंती, हे छायाचित्र घेतले आहे त्र्यंबकेश्वर रोडवरील जाधव संकुल बस स्टॉप ते कुबेर स्वामी पेट्रोल पंप 'दरम्यान या उघड्यावर संसार थाटलेल्या या गरीबांचे, आम्हाला स्वच्छता गृह बांधुन दिल्यास आमचा कुणालाही त्रास होणार नाही.भास्कर जाधव.सातपुर कॉलनी (नाशिक).
'' आम्हालाही तात्पुरते स्वच्छता गृह बांधुन द्या ''
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2021, 5:32 am