इंदिरा नगर येथील वामनकृपा सोसायटीच्या जय अहिरे आणि त्याचे चिमुकले मित्र यांनी आज आपल्या समोर आदर्श ठेवला आहे. आज त्यांनी पांच दिवसांच्या शाडुच्या गणपतीचे घरीच टबमधे विसर्जन केले. तसेच पांच दिवस गणपतीला वाहिलेले निर्माल्य सुध्दा सोसायटीच्या आवारातच खड्डा करून पुरले.पर्यावरण रक्षणासाठी अशा प्रकारे नवीन पिढीने घेतलेला पुढाकार सुखावह वाटतो.प्रवीण वालझाडे, इंदिरा नगर, नासिक.
चिमुकल्यांनी ठेवला आदर्श
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Sep 2017, 5:32 am