नाशिक रोड येथील 'मॉडेल' कॉलनी मधील 'विघ्नहर्ता गणेश मंदिर' ते 'हरेश्वर महादेव मंदिर' येथील रस्त्याचे संपूर्णपणे डांबरीकरण करणे अत्यावश्यक आहे. कारण येथे सणासुदीत निमित्ताने देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडे डांबरीकरण नसल्यामुळे तेथे झाडेझुडपे वाढली आहेत. परंतु ती नगरपालिकेकडून कापली जात नसल्यामुळे तेथून चालता येत नाही. तेथे गाडी पार्किंग करता येत नाही. संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण झाले तर सदर रस्ता रुंद होऊन वाहनांना अडथळा होणार नाही. - संगीता जांभळे, नाशिक रोड.
संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2021, 5:32 am