स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक परंतु जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य होताना आता दिसत आहे एका बाजूला नाशिक स्मार्ट होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा एक अपवाद आहे. नाशिक मध्ये खूप ठिकाणी तुम्हाला अशे दृश्य बघायला मिळतील.ओला कचरा सुखा कचरा तर लांबच येथे दुर्गंधी भरलेले रस्ते तयार होत आहे नाशिक महानगरपालिका जागोजागी सूचना फलक लावता सकाळी सकाळी कचरा उचलायला घंटा गाडी येते पण लोक स्वतः मधी बदल करणार नसेल तर प्रशासन पण यात काय करणार आहे. अश्या वागण्यानं लोक स्वतः च आजाराचे निमंत्रण देत आहे. याचा दुष्परिणाम नवनवीन आजार , प्राण्याच्या विष्टा, मच्छर, यांची यात भर पडत असते ... येवढ्या प्रमाणात जर नाशिकच्या प्रत्येक भागात कचरा असेल तर स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक ....यावर प्रश्न पडतो आहे ???हा परिसर शिवाजी चौकभाजी मार्केट सिडको येथील आहे. येथे रोज भाजीवाल्यांची वर्दळ असते . भाजी विकल्यानंतर भाजी विक्रतेच येथे कचरा आणि खराब भाज्या टाकत असता.
कचऱ्याचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2020, 5:47 am