पंचवटीतील दिंडोरी रोडवरील मेरी कॉलनीतील पत्र्याच्या कचरा कुंडीची खूपच दुरावस्था झाली आहे,कचरा कुंडी तुटली आहे त्यामुळे कचरा मुख्य रस्त्यावर पसरला आहे.या भागात सेतू कार्यालय,गुन्हे अन्वेषण विभाग,मराठा मुलांचे वसतिगृह आणि अनेक नागरिकांचे वास्तव्य आहे.कचरा व्यवस्थापन नीट नसल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छ नाशिक-सुंदर नाशिक फक्त फलकांवर आहे असे वाटू लागले आहे.
कचरा कुंडीची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 4:02 pm