एक करोना क्वारंटाईन कुटुंब नाशिक येथे हरी विश्व संकुलतील एक सदनिका तथाकथित इस्टेट एजंट कडुन भाडेतत्त्वावर घेऊन रहात आहे. त्यांनी ही सदनिका त्यांच्या कवारंटाईन वेळेत मिळवून खंबाळे ह्या त्यांच्या घरात न राहता येथे शिफ्ट करते झाले. मेडिकल ऑफिसर इगतपुरी यांचं पत्र व कलेक्टर मांढरे साहेबांचं परदेस नोट सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाल्या वर त्यांना हरी विश्व येथुन शिफ्ट केले होते. परंतु काल सदर कुटुंब पुन्हा एकदा रहायला हरी विश्व मध्ये आहे. त्यांच्या ह्या वास्तव्याने हरी विश्व संकुलतील रहीवास्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सदर सदनिका भाडेतत्त्वावर घेतांना ह्या कुटुंबाने पोलिस वेरीफिकेशन व भाडेकरार सोसायटीला दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर कुटुंब कवारंटाईन साठी ताब्यात घेतल्यानंतर वेळ पुर्ण होण्याआधी कसे सोडून दिले गेले ह्या बाबतीत रहिवाशांना आश्चर्यकारक वाटत आहे.
करोना क्वारंटाईन कुटुंब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2020, 5:44 am