अ‍ॅपशहर

टोल नाक्यावरची अरेरावी संपता संपेना

Maharashtra Times 10 Mar 2017, 3:29 pm
रविवारी काही कार्यक्रमानिमित्त चांदवडला जाण्याचा योग आला. पहिला टोल नाका लागला तो पिंपळगाव बसवंतचा! भली मोठी लाइन! वाहनांच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. मागून येणारी वाहने मध्ये घुसत होती, त्यामुळे खूपच वेळ लागत होता. अशातच व्हॉट्सअॅपची पोस्ट आठवली, की जर तुम्हाला १०० मीटर किंवा पिवळ्या पट्ट्याच्या आधीपासून वाहन थांबवावे लागले, तर टोल द्यायची गरज नाही, असा नियम आहे. (अर्थात, पिवळा पट्टा तर काही नव्हता तिथे.) पण, व्हॉट्सअॅपची पोस्ट होती, त्यामुळे शहानिशा करणे आवश्यक होते. २०-२५ मिनिटांनी आमचा नंबर आला, तेव्हा टोल नाक्यावरच्या मुलीला या नियामाबद्दल विचारले, तर असा नियम असल्याचे तिने सांगितले. मग मी म्हटले, आम्हाला जाऊ दे, कारण आम्ही २०० मीटरपासून थांबलोय, तर तिने चक्क नकार दिला अन् सांगितले की असा नियम असला, तरी आमच्याकडे तशी सिस्टिम नाही. पाचेक मिनिटे वाद घातला. पण, उपयोग झाला नाही. शेवटी नाईलाजाने टोल भरून पुढे निघालो. ज्याप्रमाणे वाहनाच्या प्रकारानुसार किती टोल आकारला जाईल, असे फलक असतात त्याप्रमाणे इतर सर्व नियमपण असावेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम toll plaza
टोल नाक्यावरची अरेरावी संपता संपेना


- दीपक मंडलिक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज